जयजयाजी व्यंकटरमणा । दयासागरा परिपूर्णा ।
परंज्योती प्रकाशगहना । करितो प्रार्थना श्रवण कीजे
MEANING
Victory to you, O Venkata Ramana! Ocean of mercy, the Complete One. O Supreme Light, profound radiance, I pray to you — please listen.
जननीपरी त्वां पाळिले । पितयापरी त्वां सांभाळिले ।
सकळ संकटांपासुनि रक्षिले । पूर्ण दिधले प्रेमसुख
MEANING
Like a mother, you have nurtured me. Like a father, you have protected me. You have shielded me from all calamities and blessed me with the fullness of love.
हे अलोलिक जरी मानावे । तरी जग हे सृजिले आघवे ।
जनक जननीपण स्वभावें । सहज आले अंगासी
MEANING
Even if this seems extraordinary, you have created this entire world. The qualities of father and mother have naturally come to you.
दीननाथा प्रेमासाठी । भक्त रक्षिले संकटी ।
प्रेम दिधले अपूर्व गोष्टी । भजनासाठी भक्तांच्या
MEANING
O Lord of the poor, for the sake of love, you have protected your devotees in times of distress. You have given them extraordinary love, for the sake of their devotion.
आता परिसावी विज्ञापना । कृपाळुवा लक्ष्मीरमणा ।
मज घालोनि गर्भाधाना । अलोलिक रचना दाखविली
MEANING
Now hear my humble petition, O merciful consort of Lakshmi. Having placed me in this wondrous creation, you have shown me extraordinary things.
तुज न जाणता झालो कष्टी । आता दृढ तुझे पायी घातली मिठी ।
कृपाळुवा जगजेठी । अपराध पोटी घाली माझे
माझिया अपराधांच्या राशी । भेदोनी गेल्या गगनासी ।
दयावंता हृषीकेशी । आपुल्या ब्रीदासी सत्य करी
पुत्राचे सहस्र अपराध । माता काय मानी तयाचा खेद ।
तेवी तू कृपाळू गोविंद । मायबाप मजलागी
उडदांमाजी काळेगोरे । काय निवडावे निवडणारे ।
कुचलिया वृक्षांची फळे । मधुर कोठोनी असतील
अराटीलागी मृदुता । कोठोनी असेल कृपावंता ।
पाषाणासी गुल्मलता । कैशियापरी फुटतील
आपादमस्तकावरी अन्यायी । परी तुझे पदरी पडिलो पाही ।
आता रक्षण नाना उपायी । करणे तुज उचित
समर्थांचे घरीचे श्र्वान । त्यासी सर्वही देती मान ।
तैसा तुझा म्हणवितो दीन । हा अपमान कवणाचा
लक्ष्मी तुझे पायांतळी । आम्ही भिक्षेसी घालोनी झोळी ।
येणे तुझी ब्रीदावळी । कैसी राहील गोविंदा
कुबेर तुझा भांडारी । आम्हां फिरविसी दारोदारी ।
यात पुरुषार्थ मुरारी । काय तुजला पै आला
द्रौपदीसी वस्त्रे अनंता । देत होतासी भाग्यवंता ।
आम्हांलागी कृपणता । कोठोनी आणिली गोविंदा
मावेची करुनी द्रौपदी सती । अन्ने पुरविली मध्यराती ।
ऋषीश्र्वरांच्या बैसल्या पंक्ती । तृप्त केल्या क्षणमात्रे
अन्नासाठी दाही दिशा । आम्हां फिरविसी जगदीशा ।
कृपाळुवा परमपुरुषा । करुणा कैशी तुज न ये
अंगीकारी या शिरोमणि । तुज प्रार्थितो मधुर वचनी ।
अंगीकार केलिया झणी । मज हातींचे न सोडावे
समुद्रे अंगीकारीला वडवानळ । तेणे अंतरी होतसे विहवळ ।
ऐसे असोनी सर्वकाळ । अंतरी साठविला तयाने
कूर्मे पृथ्वीचा घेतला भार । तेणे सोडीला नाही बडिवार ।
एवढा ब्रम्हांडगोळ थोर । त्याचा अंगीकार पै केला
शंकरे धरिले हाळाहळा । तेणे नीळवर्ण झाला गळा ।
परी त्यागिले नाही गोपाळा । भक्तवत्सला गोविंदा
माझ्या अपराधांच्या परी । वर्णिता शिणली वैखरी ।
दृष्ट पतीत दुराचारी । अधमाहुनि अधम
विषयासक्त मंदमति आळशी । कृपण कुव्यसनी मलिन मानसी ।
सदा सर्वकाळ सज्जनांशी । द्रोह करी सर्वदा
वचनोक्ति नाही मधुर । अत्यंत जनांसी निष्ठुर ।
सकळ पामरांमाजी पामर । व्यर्थ बडिवार जगी वाजे
काम क्रोध मद मत्सर । हे शरीर त्यांचे बिढार ।
कामकल्पनेसी थार । दृढ येथे केला असे
अठरा भार वनस्पतींची लेखणी । समुद्र भरला मषीकरुनी ।
माझे अवगुण लिहिता धरणी । तरी लिहिले न जाती
ऐसा पतित मी खरा । परी तू पतितपावन शारद्गधरा ।
तुवा अंगीकार केलिया गदाधरा । कोण दोषगुण गणील
नीच रतली रायाशी । तिसी कोण म्हणेल दासी ।
लोह लागता परिसासी । पूर्वास्थिती मग कैंची
गावीचे होते लेंडवोहळ । गंगेसी मिळता गंगाजळ ।
कागविष्ठेचे झाले पिंपळ । तयांसी निद्य कोण म्हणे
तसा कुजाति मी अमंगळ । परी तुझा म्हणवितो केवळ ।
कन्या देऊनिया कुळ । मग काय विचारावे
जाणत असता अपराधी नर । तरी का केला अंगीकार ।
अंगीकारावरी अव्हेर । समर्थे न केला पाहिजे
धाव पाव रें गोविंदा । हाती घेवोनिया गदा ।
करी माझ्या कर्माचा चेंदा । सच्चिदानंदा श्रीहरी
MEANING
Rush to my aid, O Govinda! Taking the mace in hand, destroy the bondage of my karma, O Sachidananda Sri Hari!
तुझिया नामाची अपरिमित शक्ति । तेथें माझी पापे किती ।
कृपाळुवा लक्ष्मीपती । बरवे चित्ती विचारी
तुझे नाम पतितपावन । तुझे नाम कलिमलदहन ।
तुझे नाम भवतारण । संकटनाशन नाम तुझे
MEANING
Your name purifies the fallen. Your name burns away the sins of Kali Yuga. Your name liberates from worldly bondage. Your name destroys all calamities.
आता प्रार्थना ऐके कमळापती । तुझे नामी राहे माझी मती ।
हेचि मागतो पुढतपुढती । परंज्योती व्यंकटेशा
MEANING
Now hear my prayer, O Lord of Kamala (Lakshmi). May my mind remain fixed upon your name. This is what I ask again and again, O Supreme Light, O Venkatesha.
तू अनंत तुझी अनंत नामे । तयांमाजी अति सुगमे ।
ती मी अल्पमति प्रेमे । स्मरूनी प्रार्थना करीतसे
श्रीव्यंकटेशा वासुदेवा । प्रद्युमन्ना अनंता केशवा ।
संकर्षणा श्रीधरा माधवा । नारायणा आदिमूर्ते
पद्मनाभा दामोदरा । प्रकाशगहना परात्परा ।
आदिअनादि विश्वंभरा । जगदुद्धारा जगदीशा
कृष्णा विष्णो हृषीकेशा । अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा ।
नृसिंह वामन भार्गवेशा । बौद्ध कलंकी निजमूर्ती
अनाथरक्षका आदिपुरुषा । पूर्णब्रम्ह सनातन निर्दोषा ।
सकळ मंगळ मंगळाधीशा । सज्जनजीवना सुखमूर्ते
गुणातीता गुणज्ञा । निजबोधरूपा निमग्ना ।
शुद्ध सात्विका सुज्ञा । गुणप्राज्ञा परमेश्वरा
श्रीनिधीश्रीवत्सलांछन धरा । भयकृद्भयनाशना गिरीधरा ।
दृष्टदैत्यसंहारकरा । वीर सुखकरा तू एक
निखिल निरंजन निर्विकारा । विवेकखाणी वैरागरा ।
मधुमुरदैत्यसंहारकरा । असुरमर्दना उग्रमुर्ते
शंखचक्रगदाधरा । गरुडवाहना भक्तप्रियकरा ।
गोपीमनरंजना सुखकरा । अखंडित स्वभावे
नानानाटक सूत्रधारिया । जगद्व्यापका जगद्वर्या ।
कृपासमुद्रा करुणालया । मुनिजनध्येया मूळमूर्ति
शेषशयना सार्वभौमा । वैकुंठवासिया निरुपमा ।
भक्तकैवारिया गुणधामा । पाव आम्हां ये समयी